October 29, 2011

कहने की सीमा होती... सहने की भी सीमा होती है

Sayali accuses Amitabh
Sayali Bhagat accuses Amitabh Bachchan

कुछ सोच समझकर अपमान करो मेरा’
अशा शब्दांत महानायक अमिताभ बच्चन यांनी आज ‘इंटरनेट’च्या माध्यमातून होणार्‍या आपल्या बदनामीवर संताप व्यक्त केला. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसहीत बॉलीवूडमधूनही या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
‘ट्विटर’वर अमिताभ यांचा बनावट आयडी बनवून शाहरुखच्या रा-वन वर टिप्पणी करण्यात आली होती. या प्रकाराने अमिताभ दुखावले आहेत. मी हा चित्रपट अजून पाहिलेलाच नाही तर त्यावर टिप्पणी कशी काय करीन! गेल्या काही दिवसांपासून माझ्या नावाने वा माझ्याबद्दल जे लिहिले जात आहे त्यानेे मला मोठा मनस्ताप झाला आहे. मी अजूनही गप्प आहे त्याचा चुकीचा अर्थ कोणी लावू नये. माझ्यावर निशाणा साधताना शंभर वेळा विचार करा असा इशाराही अमिताभ यांनी दिला. आपले म्हणणे समजण्यात कोणीही गफलत करू नये म्हणून आधी हिंदीत आणि नंतर इंग्रजीतही अमिताभ यांनी ‘ट्विट’ केले.

(Marathi - Daily Saamana)

No comments: